नागपूर: मुख्यालयी न राहणाऱ्या नागपूर ग्रामीण मंडळीतील ३० कर्मचाऱ्यांचा जुलै-२१०७ चा घरभाडे भत्ता महावितरण कडून गोठवल्या गेला आहे. अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री नारायण आमझरे यांनी दिली आहे. तसेच ग्रामीण मंडळ कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ४ कार्यकारी अभियंतांना करणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली आहे.
महावितरण ग्रामीण मंडल कार्यालयाकडून दिलेल्या माहिती नुसार, वर्ग २ श्रेणी मधील १२, तृतीय श्रेणी मधील १ आणि चतुर्थ श्रेणी मधील १७ अश्या एकूण ३० कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठवलेला आहे. आपल्या मुख्यालयी न राहणाऱ्या मौदा विभागातील ११ कर्मचाऱ्यांचा ३०२१५ रुपये ,ग्रामीण विभाग १ मधील ८ कर्मचाऱ्यांचा१४८१० रुपये , सावनेर विभागातील ७ कर्मचाऱ्यांचा १२३९९ रुपये घरभाडे भत्ता गोठवला आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वीज ग्राहकाकडून अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. या स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. याची गंभीर दखल घेत महावितरण ग्रामीण मंडळ कार्यालयांकडून सदर कारवाई केल्या गेली. तसेच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना शिस्त न लावल्या प्रकरणी ४ कार्यकारी अभियंता याना देखील करणे दाखवा नोटीस दिली आहे.