Published On : Thu, Jun 10th, 2021

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून वीज पुरवठा केला सुरळीत

Advertisement

नागपूर: रामटेक परिसरात वादळी पावसाच्या ताडख्यामुळे नगरधन परिसरात महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून वीज पुरवठा सुरळीत केला. मंगळवारी ८ जून रोजी रामटेक तालुक्यात जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात १३२ के. व्ही. मनसर उपकेंद्र येथून नगरधन उपकेंद्रला जोडणारी ३३ के.व्ही. नगरधन वाहिनी चे नंदापुरी गाव नजिक ८ लोखंडी पोल हे अक्षरशः जमीनदोस्त झाले होते तसेच १५ पोलचे व्ही क्रॉस आर्म क्षतीग्रस्त झाले. ३ पोल पण वाकले होते. त्यामुळे नगरधन उपकेंद्रचा पुरवठा खंडित झाला व परिणामी उपकेंद्रावरून होणारा जवळपास १५ गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांनी या सर्व नुकसानीचा आढावा घेऊन तात्काळ दुरुस्ती काम वेळ सुरु केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आशिष तेजे, सहायक अभियंता प्रणय कावळे, पारितोष आगरकर आणि कर्मचारीयांनी युद्धपातळी वर अहोरात्र काम करून सर्व पडलेले ०८ पोल व १५ क्षतीग्रस्त पोल ह्यांचे काम बुधवारी पहाटे ५ वाजे पर्यंत पूर्ण केले व विद्युत पुरवठा सुरळीत केला.