Published On : Thu, Jun 10th, 2021

हद्दपार आरोपीस चाकु घेऊन वावरताना अटक

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील हद्दपार आरोपी चाकू घेऊन वावरताना जुनी कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई मंगळवार ला सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास केली असून मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी वय 36 असे अटकेतील आरोपी चे नाव आहेत

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाजअन्सारी वय 36 राहणार वारीसपुरा कामठी विविध गुन्ह्यात लिप्त असून त्याला पोलीस उपायुक्त नीलोटपल यांनी 28 डिसेंबर 2020 ला दोन वर्षाकरिता कामठी व नागपूर शहराच्या बाहेर हद्दपार केले

असून आरोपी मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी याने पोलीस प्राशसन नियमाचे उल्लंघन करून कामठी येथे वास्तव्यास आला असून कमरेत चाकू लपवून वावरत असल्याचे जुनी कामठी डीबी पथकाला माहीत होताच पोलिसांनी मंगळवार ला सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास दरोगा मज्जित परिसरात शस्त्रांसह चाकू सहअटक केली जुनी कामठी पोलीस स्टेशनला कलम 4/ 25 आर्म याक्ट सहकलम 135 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली वरील कारवाई ठाणेदार राहुल शिरे यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे तगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा ,अश्विन चहांदे ,प्रीतम मेश्राम ,रमेश बंजार यांच्या पथकाने केली