Published On : Tue, Sep 29th, 2020

लॉकडाउन काळात महावितरणकडून राज्यात २ लाख २२ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यामुळे सर्वच व्यवहार बंद असतांना या काळात महावितरणने मात्र ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देताना सुमारे २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे.या काळात विदर्भात एकूण ७१ हजार ४२५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली त्यात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉक डाउन लावण्यात आले.त्यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती होती. याही काळात सर्व खबरदारी घेऊन जीवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत ठेवला. हे करत असतानाच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी पाहिजे होती, अशा ग्राहकांना तातडीने यंत्रणा उभारून वीज जोडणी दिली.

राज्यात १ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० या काळात विविध योजनेतून २ लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. विदर्भात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.अकोला परिमंडलात-१३,९३७, अमरावती-१४,८११, औरंगाबाद-१४,३९०,बारामती-२४,५३७,भांडुप-१८,२५९,चंद्रपूर-१०,२७०,गोंदिया-९,८७२,जळगांव-१६,६२१, कल्याण ३१,२०५,कोकण-७,५१०,कोल्हापूर-२०,२०२,लातूर-१५,६६२ आणि नांदेड परिमंडलात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली.

महावितरण कडून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी www.mahadiscom.in या महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल अँप द्वारे अर्ज करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेता येईल.