Published On : Mon, Mar 9th, 2020

महावितरणची ब्रीज चमू चेन्नईला रवाना

नागपूर: चेन्नई येथे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळाच्या ब्रिज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महावितरणची चमू नुकतीच रवाना झाली.नागपूर परिक्षेत्र कार्यालयात आयोजित समारंभात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीत या चमुला शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी मुख्य अभियंता सुहास रंगारी,अधीक्षक अभियंता दिलीप दोडके,नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या चमूत व्यवस्थापक म्हणून नागपूर परिमंडलाचे सहाय्यक महा व्यवस्थापक वैभव थोरात तसेच विजयकुमार पवार,अभिलाष बारापत्रे,सुनील ढगे,रामकृष्ण वाघमोडे,महेश मेश्राम व पंकज आखाडे यांचा समावेश आहे.