Published On : Mon, Mar 9th, 2020

बहुजन समाज पक्षाचा 15 मार्च च्या विदर्भ स्तरीय मेळाव्याची वाडीत जय्यत तयारी

वाडी न प ची निवडणूक लढणार स्वबळावर!

BSP

वाडी(प्र) बहुजन समाज पक्षाचे संस्थापक व प्रमुख दिवंगत कांशीराम यांची 15 मार्च ची जयंती बहुजन समाज पक्षा तर्फे उत्साहात व जाहीर कार्यक्रमाँ च्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची माहिती बसपा हिंगणा विधान सभेचे प्रभारी रोशन शेंडे,राजेश मेश्राम, जिल्हा सदस्य राजकुमार बोरकर,नगरसेवक नरेंद्र मेंढे यानि दिली.जयंती निमित्य नागपुरातील जवाहर वसतिगृह सभागृहात विदर्भ स्तरीय मेळाच्याचे आयोजन केले आहे.

तर वाडी नगर परिषदे च्या एप्रिल मध्ये होऊ घातलेल्या पंचवरीशीय निवडणुकीत बसपा कुणाशी ही युती न करता स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याची घोषणा बसपातर्फे करणयात आली.सध्या वाडी नगरपरिषद मध्ये 25 सदस्या पैकी 7 सदस्य बसपा चे असल्याने त्यांची येत्या निवडणुकीत काय भूमिका राहील या कडे सर्वांव्हे लक्ष लागून आहे.

व पूर्वी पेक्ष्या या निवडणुकीत अधिक यश मिळण्याचा विश्वास चर्चेत बसपा पदाधिकारी यांनी व्यक्त केला.वाडी नगरपरिषद ची निवडणुकी नंतरची स्थिती त्रिशुंक राहण्याची शक्यता वर्तउन बसपा मुख्य भूमीकेत राहील असेही मत चर्चेत व्यक्त केले.या प्रसंगी नगरसेवक मनोज भांगे,सुधाकर सोंनपिपले,शशिकांत मेश्राम, गौतम मेश्राम, राजेंद्र पाटील,मनीष रामटेके,गोपाळ मेश्राम, वीरेंद्र कापसे, प्रफुल पाटील,पदाधिकारी उपस्थित होते.