Published On : Wed, Oct 2nd, 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

नागपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य महावितरणतर्फे त्यांना अभीवादन करण्यात आले.

काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उप महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता (कोळसा हाताळणी) शांताराम पौनीकर,अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, अनिल घोगले, दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर ,सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यावेळी उपस्थित होते.तत्पूर्वी प्रभारी प्रादेशिक संचालक आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहण करण्यात आले.