Published On : Wed, Oct 2nd, 2019

कामठी विधानसभा निवडणूक साठी आतापर्यंत 53 अर्ज वितरित

Advertisement

कामठी: ता प्र 1न पत्र भरण्याच्या पाचव्या दिवशी आज 1 ऑक्टोबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ श्याम मदनुरकर, सहाययक निवडणूक अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे, सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सागणे यांच्या मुख्य उपस्थितीत 34 अर्जदारांना 53 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले.असून उमेदवारी अर्ज सादर करण्याची संख्या अजूनही निरंक आहे.

4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची मुदत असली तरी अजूनपावेतो कुठल्याही राजकीय पक्ष वा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले नाही तर कामठी विधानसभा मतदार संघाचा विचार केला असता कांग्रेस-राष्ट्रवादी व भाजप शिवसेना आघाडी च्या जाहीर पहिल्या यादीत कामठी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आले नाही तसेच बसपा वा इतर राजकोय पक्षाची उमेदवारी यादी अजूनही जाहीर झाल्याचे दिसून येत नाही तर या मतदार संघात एम आय एम व वंचित बहुजन आघाडी वेगवेगळी लढत देत असल्याने या दोन्ही पक्षाच्या जाहोर यादीत कामठी विधानसभा मतदार संघातील जाहीर उमेदवारांनुसार एम आई एम चे सादिकुर रहमान तर वंचित बहुजन आघाडी साठी राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र काकडे यांचे नावे आहेत, प्रहार मधून महादूल्याचे मंगेश देशमुख यांनी नावे आहेत, मनसे पक्षातील उमेदवार सुद्धा या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच नागपूर जिल्ह्यातुन शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा आली नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी देवेंद्र गोडबोले यांनी सुदधा निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छाशक्ती दर्शविली आहे.तर कांग्रेस चे तिकिटाचे दावेदार असलेले सुरेश भोयर यांनी विधानसभा मतदार संघात आतापासूनच विविध सभा, बैठका कार्यक्रम घेऊन मतदार संघ पिंजून काढीत आहेत.

4 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून 5 ऑक्टोबर अर्जाची छाननी तर 7 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.

Advertisement
Advertisement