Published On : Thu, Jan 10th, 2019

महावितरणकडून कागदविरहित “गो-ग्रीन” वीजबिलाला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद

Advertisement

नागपूर परिमंडळात ८५० वीज ग्राहकांची नोंदणी

Mahavitaran logo

नागपूर : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूरात ६३० आणि वर्धा जिल्ह्यात२२० अश्या एकूण ८५० वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत ” गो ग्रीन” अंतर्गत नावाची नोंदणी केली . अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते.

अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement