Published On : Mon, Aug 26th, 2019

खासदार डॉ महात्मे यांनी पूरग्रस्तांसाठी दिले दोन महिन्याचे वेतन

नागपुर : सांगली कोल्हापूर सह राज्यातील पूरग्रस्तांसाठी भाजप आपदा कोष करीता वैयक्तिक योगदान म्हणून राज्यसभा खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी दोन महिन्याचे वेतन दिले .

डॉ महात्मे नी 2 लक्ष 51 हजार रुपयांचा धनादेश विधान परिषद आमदार गिरीश व्यास यांचा कडे सुपूर्त केला.यावेळी खासदार डॉ महात्मे म्हणाले की राज्यातील कोल्हापुर ,सांगली सह विविध भागात पूर आल्यानी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या स्थितीत प्रशासन मदत करीत आहेत. त्यांनी समाजातील विविध घटकाना आपापल्या परीने पूरग्रस्तांसाठी मदत करण्या चे आवहान केले.