Published On : Tue, Aug 27th, 2019

नागपूरची वाटचाल आता ‘एअरोस्पेस आणि एव्हिएशन हब’च्या दिशेने – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

Advertisement

टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या वतीने 25000 व्या फ्लोअर बिमच्या डिस्पॅच समारंभाचे आयोजन

नागपूर : टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या माध्यमातून नागपूर येथे एव्हिएशन आणि एअरोस्पेस क्षेत्राचा पाया रोवला गेला असून आगामी काळात या क्षेत्रातील जगातील नामवंत कंपन्या नागपूर येथे आपली केंद्र सुरु करणार असल्याने नागपूर आता एअरोस्पेस आणि एव्हिएशन हब बनणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सेझ मिहान येथे टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या वतीने बोईंग विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या 25000 व्या फ्लोअर बिमच्या डिस्पॅच समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजय सिंग, सलिल गुप्ते व बोईंग कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या वतीने बोईंग विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या 25000 व्या फ्लोअर बिमचे डिस्पॅच होण्याचा क्षण नागपूरकरांसाठी व विशेषत्त्वाने तरुणांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मिहान येथील अन्य कंपन्या व टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भातील तरुणांना एव्हिएशनसारख्या क्षेत्रात आपली कारर्कीद घडविण्यासाठी संधी उपलब्ध होत आहे. टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या मिहान येथील प्लाँटमध्ये नागपूर आणि विदर्भातील युवकांना प्राधान्याने रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश श्री. गडकरी यांनी दिले. नागपूर आता एज्युकेशन हब म्हणूनही जगाच्या नकाशावर येत असून यामुळे तरुणांमधील गुणवत्तेला योग्य न्याय मिळण्याबरोबरच मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रातील प्रगतीसंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था झपाटयाने वाढत असून विविध क्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणीही वेगाने होत आहे. निर्यातक्षम लघु उद्योगांच्या वाढीवर आता प्राधान्याने भर देण्यात येत असून उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. उद्योगांना अनेक सवलती देण्यात येत असून मिहान येथील उद्योगांसाठी विशेष सवलतीच्या दराने विजपुरवठा करण्यात येत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

नागपूर येथे एअरोस्पेस क्षेत्रातील पहिला प्लाँट टाटा एअरोस्पेस ॲण्ड डिफेन्स कंपनीच्या वतीने सुरु करण्यात आला. येथील उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची असून या उत्पादनांची निर्यात करण्यात येते. नागपूर येथील प्लाँटमधील तयार होणारे बोईंगसाठी लागणारे फ्लोअर बिम हे अत्यंत गुंतागुंतीचे व महत्त्वपूर्ण उपकरण असून या उत्पादनात उच्चप्रतीचा दर्जा राखण्यात येतो. आगामी काळात कंपनीच्या माध्यमातून विमान आणि हेलीकॉप्टर बांधणीसंदर्भातील तसेच सुटे भाग निर्मितीचा प्लाँट सुरु करण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Advertisement
Advertisement