Published On : Wed, Jun 7th, 2023

नागपुरात राष्ट्रवादीत हालचालींना वेग ; ‘या’ मतदारसंघाच्या अध्यक्षांची बदली

नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. नागपुरात निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बदल करण्यात आल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील चार विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बदलले आहे. शहाध्यक्षाच्या निर्णयाचा प्रदेश प्रवक्त्यांनी जाहीर निषेध केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ निर्माण झाले आहे.

पूर्व नागपूरमध्ये नवनियुक्त अध्यक्ष म्हणून चिंटू महाराज व कार्याध्यक्षपदी आकाश थेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिममध्ये राजा बेग यांची पश्चिम नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Advertisement

दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांना बदलवून मोरेश्वर जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजूसिंग चव्हाण व कार्याध्यक्षपदी आशुतोष बेलेकर यांची नियुक्ती करण्यात आली. माजी अध्यक्ष भय्यालाल ठाकूर यांनी तब्येतीच्या कारणावरून तर पश्चिमचे माजी अध्यक्ष शैलेश पांडे यांना महापालिकेची निवडणूक लढायची असल्याने त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती.

गणेशपेठ येथील पक्षकार्यालयात राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुचनेनुसार हे बदल करण्यात आल्याचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी प्रदेश महासचिव रमण ठवकर, संतोष सिंह, शिव भेंडे, अशोक काटले, प्रशांत बनकर, नसीम सिद्दिकी आदी उपस्थित होते.

दरम्यान नागरपूर महापालिकेची निवडणूक तोंडवर असताना राष्ट्रवादीत हे बदल करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी या निर्णयाचा निषेध केला.

Advertisement
Advertisement
Advertisement