मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, आजच सायंकाळपर्यंत नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे दाखल केला.
पक्षांतर्गत संघटनात्मक पातळीवरील बदल लक्षात घेता ही निवड अत्यंत निर्णायक ठरणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील भाजप निवडणुकीचे प्रभारी किरेन रिजिजूही उपस्थित होते.
भाजपमध्ये लोकशाही प्रक्रियेला महत्त्व असल्याचे अधोरेखित करत फडणवीस म्हणाले, “आम्ही १२०० मंडळांच्या निवडणुका पार पाडल्या, त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड झाली आणि आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी ही प्रक्रिया सुरू आहे.
उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम नाव जाहीर होईल. जर चव्हाण हे एकमेव उमेदवार ठरले, तर निवडणुकीची गरज भासणार नाही.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप अधिक बळकट होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.