Published On : Fri, Feb 21st, 2020

.मौदा येथील लक्ष्मी नगर व्यंकट गोलपुट्टी वय 62 यांच्या येथे भर दिवसा चोरी करण्यात आली

आज दि 20 फेब्रुवारी ला दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान मागच्या बेडरूम च्याखिडकी मधील वरील लोखंडी ग्रील तोंडून बेडरूम मधील पूर्ण समान अस्तव्यस्त करण्यात आला परंतु त्या बेडरूम मध्ये काही न मिळयाल्याने दुसऱ्या बेडरूम मध्ये मुलगी अनुसया रा. वीजयवाडा आंधप्रदेश ही माहेरी आली आणि तिने बेडरूम मध्येच बैग ठेवला व ती कामा निमित्य बैंक मध्ये गेली पर्स बेडरूम मध्येच सोडली गेली त्यामध्ये 4 बांगड्या, 14 रिंग, चारतोडा काळी पोत, 6 अंगठ्या, असा एकूण अंदाजे 10 लाखाचा सोना लंपास केला.

आई व मुलगी अनुसया घरी आली असता हा सर्व प्रकार पाहून वढीला ला फोन केला वढील शेतामधून आले व त्यांनी लगेच मौदा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, मौदा पोलीस सहाय्यक निरीक्षक मंगेस काळे घटनास्थळी दाखल झाले फिंगर प्रिंट टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली, अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कमल 454,380 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला