Published On : Fri, Feb 21st, 2020

छावणी परोषद उपाध्यक्षपदी दीपक सीरिया यांची बिनविरोध निवड

कामठी:- सात सदस्यीय कामठी छावणी परिषद च्या उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार वरील अविश्वास प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उपाध्यक्ष पदाच्या रिक्त जागेसाठी कामठी छावणी परिषद सभागृहात अध्यक्ष ब्रिगेडियर संजय नंद यांच्या अध्यक्षतेखाली व अधिशासी अधिकारी अभिजित सानप यांच्या मुख्य उपस्थितीत आज 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता घेण्यात आलेल्या विशेष सभेत सदस्य दीपक सिरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी तत्कालीन उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार, माजी उपाध्यक्ष दिनेश स्वामी पिल्ले, महेंद्रकुमार भुटानी , सीमा यादव, सुनील फ्रान्सिस प्रामुख्याने उपस्थित दर्शवून उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीला मोलाची भूमिका साकारली .उल्लेखनीय आहे की माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार यांच्याविरोधात पाच सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दर्शविला होता या अविश्वास प्रस्तावाला मंजूर केल्या नंतर ही उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली हवं इथं विशेष!

संदीप कांबळे कामठी