Published On : Mon, Jun 3rd, 2019

रामटेक येथे डाॅ.पायल तडवी ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांविरुध्द निषेध प्रदर्शने

Advertisement

तहसील कार्यालय रामटेक समोर गरजले निषेधाचे जोरदार नारे

मुंबईतील नायर रुग्णालयात एम.डी.चे शिक्षण घेणार्‍या अंत्यत मागास आदिवासी वर्गातील विद्यार्थिनी डा.पायल तडवी हिला सहपाठी तीन महिला डाॅक्टरांनी सततची जातीय प्रताडना करीत अभ्यासक्रम सोडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी कुणाचीही मदत न मिळाल्याने सततच्या रॅगींगला कंटाळुन हताश झालेल्या होतकरु डा.पायल ने आत्महत्या करण्यासारखे कठोर पाउल उचलले. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राकरिता लाजिरवाना आहे. या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध करण्याकरिता बहुजन वंचित आघाडी, माकपा,भाकपा, आदिवासी गोंडवाना ,आंबेडकरी जनता तहसील कार्यालयासमौर आज एकत्र आली. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. घटनेत सामील आरोपिंवर कठोर कारवाई करुन आदिवासी,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मानवतेला काळीमा फासणार्‍या अशा घटना टाळण्यास शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावित अशीही मागणी निवेदनात केली आहे. एड.प्रफुल अंबादे, अॅड.आनंद गजभिये