| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 3rd, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  महिला करिता स्वयंरोजगार शिबीर संपन्न

  कन्हान: जिल्हा क्रिडा अधिकारी नागपूर यांच्या सौजन्याने आदर्श बहुद्देशीय महिला मंडळ कांद्रीच्या वतीने नुकतेच स्वयंरोजगार शिबीर पार पडले.

  कार्यक्रमाचे सौ.माधुरी कुंभलकर यांच्या अध्यक्षेत विलास कटाने व्यापारी संघाचे सदस्य पारशीवनी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक सौ.सुचीता वंजारी,सागर कुंभलकर, बलवंत पडोळे संरपच कांन्द्री याच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. यावेळी उपस्थित महिलांना उद्योग धंद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःउद्योग सुरू करावा त्या करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत बँकेकडून लोण घेता येईल. यावेळी पस्तीस महींलाना पत्राळी बनवणे, शेवई तयार करणे, कापडाच्या पिशव्या तयार करणे आदीचे प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सौ.कुसुम किरपान यांनी तर आभार प्रदर्शन सौ.प्रभा कारेमोरे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सौ.कुसुम किरपान, सौ.प्रभाकर कारेमोरे, सचिव सौ.योगीता ढवाले, सौ.जयश्री कटाने, सौ.चंद्रकला धोपटे, सौ.सुंगधा शेन्दे, सौ.सुचीता वंजारी हयांनी अथक परिश्रम केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145