नवी दिल्ली: मराठवाड्यात उद्धव ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंवर नाराज असल्याने ते शिंदे गटात वाजणार अशी चर्चा होती. चंद्रकांत खैरे हे कायम मला डावलत आहेत असा आरोप अंबादास दानवेंनी केला.
चंद्रकांत खैरे मला कायम डावलत असतात, ही गोष्ट आजची नाही. मी चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचे काम करत नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही, असे दानवे म्हणाले. मी उद्धव ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाही. एखाद्या निवडणुकीसाठी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणार नाही. मी शिवसेनेतच आहे. शिवसेना आमचीच आहेत. माध्यमांना बातम्या हव्या आहेत त्यामुळे या चर्चा होत आहेत.
मला माझ्या आईने स्पष्ट सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाशी बेईमानी करु नकोस, तू असे केलंस तर तुझा आणि माझा संबंध राहणार नाही. माझ्या घरात लग्न झालं त्यावेळी जात्यावर दळताना तिने उद्धव ठाकरेंवर गाणं रचले होते.माझी आई इतकी संवेदनशील आहे. हिंदुत्वावर आईचं प्रेम आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. माझ्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असेही दानवे म्हणाले.