नागपूर : कोरोनाची साखळी जर खंडित करायची असेल तर जास्तीत- जास्त नागरिकांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, असे तज्ञांचे मत आहे. या मताला अनुसरुन नागपूर महानगरपालिका व खाजगी प्रयोगाशाळा मध्ये आतापर्यंत १८ लाख ८९ हजार ६९४ चाचणी करण्यात आली आहे. सर्वाधिक ४ लाख २६ हजार ४९३ चाचणी एप्रिल २०२१ मधे करण्यात आली आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणाच्या चमूनी व इतर केन्द्रावर आरटीपीसीआर व ॲन्टीजन या दोन्ही प्रकारच्या चाचण्या करुन नागपूर शहराला दूस-या लाटेपासून थोपविण्याचे दिशेने प्रयत्न केले आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे च्या पोर्टलवर उपलब्ध माहिती नुसार नागपूर शहरात यावर्षी एप्रिल मध्ये ४,२६,४९३ नागरिकांची कोव्हिड चाचणी केली गेली. सरासरी दररोज १४००० पेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली. मे महिन्यात १६ मे पर्यंत २ लाख ९ हजार ३९० नागरिकांची कोव्हिडची चाचणी केली गेली आहे. आता ही मनपातर्फे दूकानांमध्ये बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी मोफत चाचणी करण्यात येत आहे.
शहरात कोरोना केसेसची सुरुवात मार्च २०२० पासून झाली आणि मागच्या वर्षी मार्च मध्ये ९१८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. एप्रिल २०२० मध्ये ५९८६, मे २० मध्ये २१,४९१, जून २० मध्ये ३०,२०२, जुलै २० मध्ये ४४,५०८, ऑगस्ट २० मध्ये ८०,७२३ चाचण्या करण्यात आल्या. सप्टेंबर मध्ये मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आणि त्या महिन्यात १ लाख ४९ हजार १५८ चाचण्या करण्यात आली. ऑक्टोंबर मध्ये यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आणि १ लाख ५८ हजार ८३० नागरिकांची चाचणी करुन पहिल्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश प्राप्त झाले. मनपा आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेला दर महिन्याला एक लाख पेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांचे निर्देशाला अनुसरुन आरोग्य विभागाने खाजगी प्रयोगशाळांच्या मदतीने नोव्हेंबर २० मध्ये १ लाख ३८ हजार ५३३, डिसेंबर २० मध्ये १ लाख १३ हजार ५३९, जानेवारी २० मध्ये १ लाख ०६ हजार ९०३, फेब्रुवारी मध्ये १ लाख २७ हजार ८६० चाचण्या केली. या दरम्यान कोरोनाचे केसेस कमी होते.
महापौरांनी व आयुक्तांनी नागरिकांना कोरोनाचे लक्षणे असल्यास किंवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर लगेच चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना लस घेण्याचे पण सुचविले आहे. नागरिकांना मास्क चा वापर करावा आणि सामाजिक अंतर ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.