Advertisement
नागपूर : शहरात उन्हाच्या झळांनी नागपूरकरांचे हाल झाले आहे. यातच राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून म्हणजेच २३ जूनपासून राज्यात मान्सून धडकणार असल्याची माहिती आहे. कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगामात अद्यापही पावसाची सुरुवात झाली नाही. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
मराठवाड्यात २३ ते २९ जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.