Published On : Wed, Jun 27th, 2018

सततधार पावसाने विदर्भात गारवा

नागपूर: मृगनक्षत्र सुरु होऊन महिना उलटायला आला तरी या वर्षीच्या मान्सूनच्या पावसाने पाहिजे तशी हजेरी विदर्भात लावली नाही. जून महिन्याच्या प्रारंभी एक दोन दिवस बरसल्यानंतर १९ तारखेला पावसाने नागपुरात जोरदार हजेरी लावली होती.

मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. जून महिन्यात ही कडक उन तापत असल्यामुळे नागपूरकर उकाड्यापासून त्रस्त होत पावसाची वाट पाहू लागले होते. नागपूरकरांची ही वाट संपवीत आज सकाळपासून पावसाने नागपुरात दमदार हजेरी लावली आहे.

Advertisement

काल पर्वापासून आकाशात जमा होत असलेल्या ढगांमुळे नागपुरात लवकरच पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, तो खरा ठरत आज सकाळपासून पावसाने नागपुरात जोरदार आगमन केले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने वातावरणात गारवा पसरलेला असून नागपुरातील लोकांना उकाड्यापासून पुन्हा एकदा आराम मिळाला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement