Published On : Tue, Jul 17th, 2018

मंत्रालयाच्या मुख्य गेटवर मनसेने खोडले रस्ते.. खड्डेमुक्तीसाठी मनसे आक्रमक

खड्डेमुक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झालेली दिसतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा खोदून आंदोलन केलंय.

संपूर्ण महाराष्ट्रातल्या खड्डेयुक्त रस्त्यांचा जाहीर निषेध आणि सर्वसामान्यां जो खड्ड्यांचा त्रास होतो तोचं त्रास सत्ताधारी, निष्क्रिय युती सरकार मधील मंत्र्यांनीही व्हावा यासाठी मनसैनिकांनी हे आंदोलन करण्यात आलं.

PWDच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मंगळवारी पहाटे थेट मंत्रालयासमोर खड्डे खोदलेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 4 मनसैनिकांना मंत्रालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतलंय.