Published On : Mon, Jun 4th, 2018

आत्मदहन आंदोलन करणा-या आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांना अटक

amravati
अमरावती: काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे, यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यादरम्यान पोलिसांनी अटक केली.

काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात आत्मदहन आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे पैसे मिळावे, या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अंगावर रॉकेल ओतून घेत असताना पोलिसांनी यशोमती ठाकुरांना अटक केली. दरम्यान आंदोलनात एका शेतकऱ्यानंही आत्मदहनाचा प्रयत्न केला.