Published On : Tue, Jun 16th, 2020

आमदार टेकचंद सावरकर ने घेतला मान्सूनकाळ तयारी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

Advertisement

कामठी – पावसाळ्यात संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी करावयाची पूर्वतयारी व आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कारवाही यासंदर्भात मान्सूनकाळात तयारीची आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली कामठी पंचायत समिती सभागृहात आज 15 जून ला सकाळी 11 वाजता मान्सूनकाळातील तयारी आपत्ती व्यवस्थापणा बैठक संदर्भात तालुकास्तरीय सर्व विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हा परोषद चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जी प चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे,जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके, , उपसभापती आशिष मललेवार,, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी,सुमेध वंजारी,दिशा चनकापुरे, आदी सदस्य गण तसेच तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर,महावितरण चे उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने, आरोग्य विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकित मागील वर्षी झालेल्या मुसळधार पाऊस तसेच पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच पूरप्रवण गावाच्या नोंदीसह पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या गावाची माहिती घेण्यात आली.त्यासाठी तालुका प्रशासनाने विविध बाबीवर केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला .ज्यामध्ये तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापणा करणे, रस्ते व पुलाच्या निरीक्षण करून त्याची दुरुस्ती करणे, तहसील कार्यालयाने पावसाची ऑनलाईन माहिती प्रत्येक दिवशि अपडेट करणे, नदीच्या पुराचे निरीक्षण करणे, पूरपरिस्थिती मध्ये शोध बचाव यासाठी लागणारे सर्व साहित्याची वेळीच सोय करणे आदींवर चर्चा करण्यात आली.यावेळी आमदार सावरकर यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या यामध्ये तालुक्यात पडलेल्या क्षेत्र निहाय पर्जन्याचे माहिती प्रत्येक दिवशी आनलाईन द्वारे अपडेट करावी , नियंत्रण कक्षात जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा .

शोध व बचावासाठी लागणाऱ्या साहित्याची कुठे कमतरता असेल त्याची पर्यायी व्यवस्था पूर्वीच करून घ्यावी . सोबतच आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करून पुढील तीन महिने पुरेल इतकी औषधे रुग्णालयात साठवून ठेवावेत .पुरबाधित तसेच जोखीम असलेल्या गावांची यादी तयार करून त्यांच्याशी उत्तम संपर्क व्यवस्था निर्माण करावी .पुरपरिस्थितीत गरोदर मातांच्या प्रसूती प्रक्रियेत अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.

तसेच पाणी टंचाई, धडक सिंचन विहीर, आदींचा आढावा घेतला व आपत्ती व्यवस्थापन आराखडा, आपत्कालीन जवाबदाऱ्या, पूर व्यवस्थेपणासाठी आदर्श कार्यप्रणाली, आर्थिक व्यवस्थामध्ये असलेले पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधो, जिल्हा नियोजन निधींआदी बाबत मार्गदर्शन केले.

यानुसार या आढावा बैठकीत शिक्षण , आरोग्य, पशुसंवर्धन, महिला बाल कल्याण, कृषी, बांधकाम , ग्रामीण पाणी पुरवठा, सिंचन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,भूमी अभिलेख, महावितरण , सार्वजनिक पुरवठा व्यवस्था, वृद्धपकाळ या सर्व विभागासह इतर विभागाचा सुद्धा आढावा घेण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिव तसेच तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.