Published On : Tue, Jun 16th, 2020

रामटेक येथे मध्यरात्री प्रेम बनगैय्या यांचे घरी धाडसी चोरी

रामटेक: रामटेक येथील आझाद वॉर्डातील रहिवासी प्रेमलाल किसन बनगैय्या याचे घरी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आलमारी फोडून चोरी करून 1,14,8327 चा ऐवज लंपास केला.14 जूनच्या रात्रीला प्रेम बनगैय्या ,पत्नी व दोन मुली गाढ झोपेत असतांना फिर्यादीचे घराच्या मागील दाराचा कोंडा तोडून अज्ञात चोरत्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले सोन्या – चांदीचे दागिने असा एकूण 69,827 रुपये किमतीचा व नगदी 45000 रुपये असा एकूण 1,14,827 मुद्देमाल चोरून नेला.

ज्या भांड्यात दागिने ठेवले होते ते भांडे घरामगील वाडीत फेकून देऊन चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले.पहाटे पाचला झोपून उठल्यावर त्यांना घराचे दार हवेने हलताना दिसले.त्यानंतर त्यांनी घरात फिरल्यावर घरी चोरी झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामटेक येथे अप क्रमांक 396/2020 कलम 380,457 भादवी दाखल करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तातडीने पुरावे गोळा करणेकामी फिंगर प्रिंट आणि श्वान पथकाला पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले.-

उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर ,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे , प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.