Published On : Wed, Jun 26th, 2019

आमदाराच्या अंगात वर्दी, शहीद करकरेंच्या रुपात विधान भवनात एण्ट्री

Advertisement

मुंबई : नेहमीच वेगवेगळ्या पोशाखात अनोख आंदोलन करुन अधिवेशनात हजेरी लावणारे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी यंदाही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असताना आमदार प्रकाश गजभिये यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या पोशाखात विधानभवनात एण्ट्री केली. यासोबतच गजभिये यांनी हातात फलक घेत “प्रज्ञाच्या शापाने मरण पावलेलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शाहिद झालो”, असं त्यावर म्हटलेलं आहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. प्रज्ञा म्हणाली होती, “हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना श्राप दिलेला आणि त्यामुळेच त्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला”, असं वादग्रस्त विधान केलं होते. प्रज्ञा ठाकूरच्या या विधानावर देशभरातून तिच्यावर टीका करण्यात आली होती. यालाच प्रतिउत्तर देत आमदार प्रकाश गजभिये विधानभवनात शहीद हेमंत करकरेंच्या पोशाखात दाखल झाले होते. यावेळी विधानभवनाच्या गेटजवळ गजभिये यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्नही केला होता.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात गजभिये नेहमी वेगवेगळ्या पोशाखात येत असतात. गेल्यावर्षीही गजभिये शिवाजी महाराजांच्या पोशाखात आले होते. मात्र या पोशाखामुळे ते अडचणीत सापडले होते.

कोण आहेत प्रकाश गजभिये ?
प्रकाश गजभिये हे राष्ट्रवादीचे विधानपरीषदेतील आमदार आहेत. गजभिये हे नागपूर येथे राहतात. प्रकाश गजभिये नागपूर महानगरपालिकेत त्यांनी विरोधी पक्ष नेते पद भूषविले होते. यासोबतच नागपूर विद्यापीठावर ते सिनेट सदस्य होते.

Advertisement
Advertisement