Published On : Tue, Jul 3rd, 2018

नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणारं पावसाळी अधिवेशन एक दिवसावर आलं असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही शिवसेना आमदार रमेश लटके यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं.

विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement