Published On : Wed, Nov 20th, 2019

आमदार कृष्णा खोपडे यांनी नगरसेविका मनिषा कोठे यांचे केले अभिनंदन

उपमहापौर पदावर निवड झाल्याबद्दल केला सत्कार

नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरातील प्रभाग क्र. 26 वाठोडा भागाच्या नगरसेविका सौ.मनिषाताई कोठे यांचे अभिनंदन केले. नुकतेच त्यांची नागपूर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाकरिता पक्षातर्फे निवड करण्यात आलेली असून त्यांनी नामांकन दाखल केले आहे.

सौ.मनिषाताई कोठे या सलग दुसऱ्यांदा वाठोडा या भागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून यापूर्वी महिला व बाल विकास समितीच्या सभापती म्हणून देखील महानगर पालिकेत काम केले आहे. तसेच भाजपच्या महिला आघाडी मध्ये शहराच्या महामंत्री म्हणून त्यांनी पक्ष संगठन मध्ये सुद्धा काम केले आहे. नगरसेविका म्हणून त्यांची कामगिरी लक्षात घेता पक्षाने त्यांची सर्व संमतीने उपमहापौर पदाकरिता निवड केल्यामुळे आमदार कृष्णा खोपडें सह पूर्व नागपूर भा.ज.प. ने देखील त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी पूर्व नागपूर भा.ज.प. चे अध्यक्ष महेंद्र राऊत, लकडगंज झोनचे सभापती राजकुमार सेलोकर, नगरसेवक अनिल गेंडरे, मनिषा अतकरे, अभिरुची राजगिरे, समिता चकोले, मनिषा धावडे, मंडळ महामंत्री देवेंद्र काटोलकर, संजय अवचट, सेतराम सेलोकर, बाळा विटाळकर, संपर्क प्रमुख सुनिल सूर्यवंशी, अनिल कोडापे, सचिन काळबांडे, शरद पडोळे, विरेंद्र कोहळे, राजू भोयर, अशोक लेदे, विनायक गोहने, नितीन सावरकर, पवन गावंडे, सुभाष करडभाजने, संजय पौनीकर, ग्यानी चंदेल, पुरुषोत्तम कडू, प्रविण बोबडे, लक्ष्मीकांत हिवसे, संजय बेलसरे, नरेंद्र शेंडे, अनिकेत ठाकरे व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.