Published On : Wed, Jan 29th, 2020

विधायक जैस्वाल ची नगर पंचायत,पाराशवनी ला धावती भेट

पाराशिवनी : आज दिनांक २७/०१/२०२० रोज पारशिवनी नगर पंचायत येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. आशिष जयस्वाल यांनी भेट दिली. नवनि।र्वाचित आमदार झाल्या नंतर प्रथमच पारशिवनी नगर पंचायत येथे आल्यामुळे पारशिवणीच्या नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई कुंभलकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी पारशिवनी गावातील दूषित पाणी पुरवठा दूर करण्यासाठी उच्च पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना व जिल्हा अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले.

तसेच कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन (न.प.)मुख्याधिकारी यांना कचरा संकलन व्यवस्थेला जलद गतीने व तत्परतेने कार्य करण्याचे निर्देश दिले. व पारशिवनी लगत असलेल्या काशी पाझर तलवाच्या समस्या जाणून नगर सेवकांना उर्वरित कामाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.तसेच कुवारा भीवसेन महोत्सव मैदान लगत असलेल्या नगर पंचायतच्या जागेची पाहणी करून सदर जागेला समतोल करुन त्या जागेवर सांस्कृतिक (समाजभवण) निर्मिती करण्यासाठी नगर पंचायत मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना निर्देश दिले.

Advertisement

या भेटीत नगर पंचायत अध्यक्ष सौ. प्रतिभाताई कुंभलकर, मुख्याधिकारी श्री भारत . नंदनवार, उपाध्यक्ष-स्वच्छता सभापती, सौ माधुरी भिमटे , सो आशा वैद्य पानी पुरवठा सभापती आनिता भड़ माहहला बाल कल्याण सभापती, देवानंद वाकोड़े बाधकाम सभापती, व नगर पंचायत चे नगर सेवक ,शिवसेना गटनेते श्री. दिपक शिवरकर, नगरसेवक श्री. राहू ढगे, श्री. रोशन पिंपरामुळे संबंधित विभागाचे आधाकारी व गावातील प्रमुख नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement