Published On : Sat, Jun 29th, 2019

गुमथळा येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी :-आरोग्य ही मानवाची पहिली संपत्ती आहे. ही संपत्तीच नीट जपण्यासाठी आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची संपत्ती जपली तरच पुढचे आयुष्य जगणे सुकर होणार आहे. यासाठी आरोग्यासाठी शासनाने आणलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेत आरोग्य सांभाळण्याचा मोलाचा मंत्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

कामठी विधानसभा मतदारसंघातील गुमथळा येथे श्री श्री फाऊंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती अनिता चिकटे, भाजप तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, माजी जी प सदस्य अनिल निधान, सरपंच रामकृष्ण वंजारी, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, श्रीमती ज्योती बावनकुळे, जि.प. सदस्य विनोद पाटील, सरपंच शालिनी मोहोड, मोबीन पटेल, राजकुमार घुले, सरपंच मंगला थेटे, सरपंच बंडूजी बोरकर, नरेश मोटघरे, कपिल गायधने आदी उपस्थित होते. प्रचंड गर्दी करीत 2200 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 1571 रुग्णांची नि:शुल्क तपासणी आणि औषधोपचार या रुग्णांना देण्यात आला.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- आरोग्य चांगले असेल तर जीवनाचा आनंद प्रत्येकाला घेता येतो. प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. केंद्र आणि राज्य शासनाने ग्रामीण भागातील गरीब माणसासाठी आरोग्याच्या अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. त्या सर्व योजनांची माहिती या शिबिरात मिळणार आहे. प्रत्येकाने या योजनांची माहिती जाणून घेत आरोग्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. श्री श्री फाऊंडेशनचे संकेत बावनकुळे यांनी या आरोग्य शिबिरामागची संस्थेची भूमिका विशद केली.


या शिबिरात 325 रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली असता 132 रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 117 रुग्णांची ईसीजी काढण्यात आले. 258 जणांची रक्त तपासणी करण्यात आली. 225 रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली. याशिवाय हृदयरोग तपासणी 59 जणांची, किडणी, मेंदू, अस्थीरोग अशी 242 जणांची तपासणी करण्यात आली. विविध रुग्णांच्या तपासण्यासाठी 20 काऊंटर तयार करण्यात आले होते. या सर्व काऊंटर रुग्णांची गर्दी होती.

शिबिरात मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, दंत विभागातर्फे डॉ. वैभव कारेमोरे, नेत्र विभागातर्फे डॉ. मदान, आशा हॉस्पिटल कामठीतर्फे सौरभ अग्रवाल यांची चमू कार्यरत होती. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू, डॉ. सुनील फुडके यांचाही शिबिरात सक्रिय सहभाग होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेश बोंडे, कुणाल ढाले, प्रितम लोहासारवा, हर्षल हिंगणीकर, कपिल गायधने,प्रमोद ढोबळे, विनोद वाठ, जितू मेहररकुडे, सारंग पिपळे, अंबर वाघ, दिलीप मुळे, सचिन शर्मा आदीनी प्रयत्न केले.

संदीप कांबळे कामठी