Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लैंगिक छळ प्रकरणात फरार राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला चंद्रपुरातून अटक

Advertisement

लैंगिक छळ प्रकरणात फरार राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला चंद्रपुरातून अटक

नागपूर : लैंगिक छळाच्या प्रकरणात फरार असलेल्या राज्यमंत्र्यांच्या बॉडीगार्ड अजय सदाशिव सलामे (वय 38) याला रामटेक पोलिसांनी चंद्रपुरातून अटक केली. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर उशिरा रात्री त्याला रामटेक येथे आणण्यात आले. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अजय सलामे याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक येथील एका महिलेने अजय सलामे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर आरोपीचे अन्य एका महिलेसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, त्यानंतरही अजय सलामे याने पीडितेवर संपर्क कायम ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात आरोपीच्या संपर्कात असलेल्या एका महिला वकिलीलाही सहआरोपी करण्यात आले असून, तिने पीडितेच्या मुलांना इजा करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

रामटेक पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अजय सलामे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अटकेपासून बचावासाठी प्रयत्न-
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच अजय सलामे फरार झाला होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने अग्रिम जामिनासाठीही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रामटेक पोलीस त्याचा शोध घेत होते.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चंद्रपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. या प्रकरणातील सहआरोपी महिला वकिलीस अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती आहे.

पत्नीनेही पतीविरोधात केली होती तक्रार-
अजय सलामे यांच्या पत्नीनेही 24 ऑगस्ट रोजी आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, आरोपीच्या पत्नीने पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.

बॉडीगार्ड निलंबित; विभागीय चौकशी सुरू-
प्रकरण दाखल झाल्यानंतर पोलीस विभागाने अजय सलामे याला निलंबित केले आहे. त्याच्याविरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.