Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

डीजेमुळे इतरांना त्रास देणे इस्लाममध्ये अमान्य; प्यारे खानांकडून फतव्याचे स्वागत

Advertisement

डीजेमुळे इतरांना त्रास देणे इस्लाममध्ये अमान्य; प्यारे खानांकडून फतव्याचे स्वागत

नागपूर : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे इतरांना त्रास होणे किंवा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणे, हे इस्लाममध्ये अमान्य असल्याचे स्पष्ट करणारा फतवा जारी करण्यात आला आहे. या फतव्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्वागत केले आहे.

मुज्तबा शरीफ खान अशहरी मिस्बाही, मुहतमिम अल-जामेअतुर रज़विया दारुल उलूम अमजदिया यांच्या वतीने हा फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लाममध्ये कोणत्याही व्यक्तीला त्रास देण्यास किंवा इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करण्यास परवानगी नसल्याचे फतव्यात नमूद करण्यात आले आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ईद, मुस्लिम समाजाच्या दर्ग्यांवरील कार्यक्रम, संदल तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवून कर्णकर्कश आवाज निर्माण करू नये, असे आवाहनही या फतव्याद्वारे करण्यात आले आहे. धार्मिक उत्सव साजरे करताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करणे आवश्यक असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, समाजातील धार्मिक कार्यक्रमांमध्येही ध्वनिप्रदूषण टाळण्याच्या या भूमिकेचे प्यारे खान यांनी स्वागत केले. कायदा सर्वांसाठी समान असून, धार्मिक श्रद्धा आणि उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.