Published On : Wed, Jul 18th, 2018

राज्यमंत्री येरावार यांना भटक्या विमुुक्तांचे निवेदन

कन्हान : – सामान्य प्रशासन तथा भटक्या विमुक्त मागासवर्गीय कल्याण राज्यमंत्री मदन येरावार यांना भटक्या विमुक्तांच्या विविध विषयांवर मंगळवारी (दि.१७) ला निवेदन देवून चर्चा करण्यात आली. यात भटक्या विमुक्तांना किमीलिअरच्या जाचक अटीतून वगळण्यात यावे, नागपूर मेडिकल कॉलेजचे नामांतर कन्नमवार काॅलेज व्हावे, भटक्या विमुक्तांची रखडलेली शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी, नर्सिग प्रवेशात शिष्यवृत्ती प्रदान करावी आदी मागण्यांचा समावेश होता.

यावेळी मुकुंद अडेवार लिखित बेलदार समाजाचे पुस्तक मंत्री येरावार यांना बेलदार समाज संघर्ष समितीचे सचिव खिमेश बढिये यांनी भेट दिली. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन अशी ग्वाही येरावार यांनी दिली.

Advertisement

या शिष्टमंडळात भटक्या विमुक्त कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रेमचंद राठोड, गोसावी समाज संघटनेचे सचिव महेश गिरी, बेलदार समाज संघर्ष समिती चे सदस्य दिनेश गेटमे, राजेश मलिये, किरात समाज संघटनेचे पदाधिकारी अशोक खंडाईत, योगेश गडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर शहर संघटक व वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे, राज्य खासगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव विजय आगरकर, ढिवर समाज संघटनेचे प्रदिप बावने, सुर्यलक्ष्मी काॅटन मिलचे कामगार नेते रेवनाथ मदनकर, जगदीश पटले, सामाजिक कार्यकर्ते गिरीश झंवर आदी समाज बांधव उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement