Published On : Tue, Dec 3rd, 2019

महानगर आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांनी पीएमवाय’च्या प्रकल्पांची केली पाहणी

Advertisement

विहित मुदतीत कार्य पूर्ण करण्याचे अधिकारी व कंत्राटदारांना दिले निर्देश

नागपूर: नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज मंगळवार, दिनांक ०३ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माणाधीन प्रकल्पांचा दौरा केला. श्रीमती शीतल तेली-उगले यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या खसरा क्रमांक ६२ मौजा तरोडी (खुर्द), खसरा क्रमांक ६३ मौजा तरोडी (खुर्द) आणि खसरा क्रमांक १२/१-२, मौजा वांजरी येथील निर्माणाधीन घरकुलांचे निरीक्षण केले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खसरा क्रमांक ६२ मौजा तरोडी (खुर्द) मध्ये ९४२ घरकुले, खसरा क्रमांक ६३ मौजा तरोडी (खुर्द) मध्ये २३७४ घरकुले आणि खसरा क्रमांक १२/१-२, मौजा वांजरी येथे एकूण ७६५ घरकुले तयार करण्यात येत आहे. या घरकुलांचे वाटपपत्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहे, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घराचा ताबा देण्यात यावा, यासाठी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना विहित मुदतीत कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

घरकुलांसाठी रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मीटर रूम, पावसाळी पाणी वाहीका, रेन वोटर हार्वेस्टिंग, पार्किंग, कंपाउंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंचे दुकाने, बाह्य विद्युतीकरण, सार्वजानिक सुविधेकरता सौर ऊर्जा संच, सौर उर्जेवर चालणारी पथदिवे आवश्यकता असल्यास स्वतंत्र मल निस्सारण व्यवस्था इत्यादी सोयी सुविधा याठिकाणी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार, नामप्राविप्रच्या अधिक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर आणि साहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement