Published On : Mon, Jun 7th, 2021

मेट्रो: सुरक्षित प्रवासाचे खात्रीशीर साधन

नागपूर: नागपुरात कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध उठवले. या पाठोपाठ महा मेट्रोने देखील आपल्या सेवेत बदल करत आजपासूनच एक तासाच्या ऐवजी आता दर ३० मिनिटाने प्रवासी सेवा सुरु केली. निर्बंध उठवल्या नंतर महा मेट्रोच्या दोन्हीही ऑरेंज आणि एक्वा मार्गिकांवर पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि महा मेट्रो सुरक्षित प्रवासाचे साधन असल्याचा विश्वास सार्थ केला.

गेल्या एक वर्षापासून नागपुरात कोरोनाने थैमान घातले होते. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत महा मेट्रोने पहिल्या दिवशी पासून अनेक पाऊले उचलली होती. महा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेत कोरोना रोगापासून त्यांची सुरक्षा करण्याकरता आजही ती सर्व पाऊले उचलली जात आहे आणि पुढेही जातील. प्रवाशांचे आरोग्य सर्वतोपरी ठेवल्यांक परत एकदा नागपूरकरांनी महा मेट्रोवर विश्वास दाखवला आहे.

Advertisement

मेट्रो ट्रेन सातत्याने सॅनिटाईझ केले जाते. संपूर्ण गाडी सॅनिटाईझ करताना, मेट्रो कर्मचारी टच-पॉईंट साफ करण्याकडे सातत्याने आणि विशेषत्वाने लक्ष देतात. मेट्रो स्टेशन वर असलेल्या लिफ्टचा उपयोग करताना सुरक्षेचे उपाय म्हणून तिथे प्रवाश्यांच्या वापरकरता टूथ पीक ठेवले असतात. एकीकडे डिजिटल पद्धतीने तिकीट घेण्याकरता प्रवाश्यांना प्रोत्साहित करताना, रोख देत प्रवासी दर भाडे दिल्यास त्या रकमेचे अल्ट्रा व्हॉयलेट किरणांच्या माध्यमाने निर्जंतुकीकरण केले जाते.

एक कॅफत काम करणारे विजय राऊत रोज लोकमान्य नगर ते झाशी राणी स्टेशन दरम्यान प्रवास करतात. महत्वाचे म्हणजे आपला हा प्रवास सोपा करण्याकरता ते सायकल घेत मेट्रोने प्रवास करतात. “सायकल घेत मेट्रो ने प्रवास करण्याची हि सोया आपल्याकरता अतिशय फायद्याची असल्याचे” राऊत म्हणाले. मी रोज लोकमान्य नगर ते झाशी राणी दरम्यान मेट्रोनेच प्रवास करतो आणि पुढे देखील करेन असे ते आत्मविश्वासाने म्हणाले.
पेशाने व्यवसायी असलेले नंद शुक्ला यांनी आज मेट्रोने प्रवास केला. मेट्रोचा प्रवास अतिशय सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मेट्रोचा कर्मचारी आणि अधिकारीवर्ग अतिशय नम्र असून प्रवाश्याना सहकार्य करत असल्याचे शुक्ला म्हणाले.

महा मेट्रो गाडीने प्रवास करणे म्हणजे सुरक्षित प्रवास असल्याचा नागपूरकरांना विश्वास आहे. एकीकडे नागपूरकरांच्या हा विश्वास असताना दुसरीकडे महा मेट्रो देखील प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आवश्यक ते सर्व करण्या करता कटिबद्ध आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही याचा संपूर्णपणे नायनाट झाला नसल्याने नागपूरकरांनी सुरक्षित पावसाकरता मेट्रोचा वापर कारावा हे आवाहन करीत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement