Published On : Mon, Jun 7th, 2021

ल.मं.हॉ. येथे भरती रुग्णांचा १००% निःशुल्क उपचार व ऑपरेशन

Advertisement

लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूरतर्फे २०२१ हे वर्ष ‘लोकनेते मा.श्री. रणजीतबाबू देशमुख अमृत महोत्सव वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्याने, वर्षभर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असून दि. ०७ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत रुग्णालयातील सर्वच विभागातील जनरल वार्डमध्ये भरती रुग्णांचा “१००% निःशुल्क उपचार व ऑपरेशन” करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत, दि. ०७ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत कोणत्याही विभागातील जनरल वार्डमध्ये भरती झालेल्या सर्वच वयोगटातील रूग्णांना बेडचा खर्च, नर्सिंग चार्जेस, विशेषज्ञांद्वारे तपासणीचा खर्च लागणार नाही. सर्व प्रकारचे ऑपरेशन, उपचार, रक्ताच्या तपासण्या, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, २-डी इको व इतर सर्व प्रकारच्या निदान चाचण्या नि:शुल्क करण्यात येतील. भरती रुग्णांना दररोज २ वेळा नि:शुल्क भोजनसुद्धा मिळेल. औषधी, इम्प्लांट, ब्लड बॅंक, बाहेरील चाचण्या, फिल्मचा या नि:शुल्क सेवेत समावेश नाही. या कालावधीत ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांचीसुद्धा नि:शुल्क नोंदणी करून, सर्वच ओपीडीमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत विशेषज्ञांद्वारे नि:शुल्क तपासणी करून, सल्ला देण्यात येत आहे.

सोबतच, कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी जवळपास सर्वच विभागातील विशेषज्ञांद्वारे विशेष तपासणी व मार्गदर्शनासाठी नि:शुल्क ओपीडी सुरु केलेली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून सावधगिरीसाठी मेडिसिन ओपीडीमध्ये ३० जूनपर्यंत सुरु असलेल्या ‘नि:शुल्क मधुमेह व लठ्ठपणा नियंत्रण शिबीरा’लासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व नि:शुल्क योजनांचा रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी श्री. जितेंद्र मुळे यांच्याशी ९९२३०४१९०७ वर संपर्क साधता येईल.