Published On : Mon, Nov 6th, 2017

पोर्णिमा दिनानिमित्त उर्जाबचतीचा संदेश – मनपा व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे उपक्रम

pournima diwas 6 nov 2017
नागपूर: नागपूर महानगर पालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोर्णिमा दिनानिमित्त उर्जाबचतीसाठी जनजागृती करण्यात आली. मानेवाडा चौक परिसरात स्वयंसवेकांनी नागरिकांमध्ये पोर्णिमादिनानिमित्त अनावश्यक विद्यूत दिवे बंद ठेवून उर्जाबचतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत रात्री 8 ते 9 दरम्यान परिसरातील प्रतिष्ठांनामधील अनावश्यक दिवे बंद ठेवून उर्जाबचतीचा संदेश देण्यात आला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेविका विशाखा बांते, माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी यांच्यासह स्वयंसेवकांनी नागरिकांमध्ये तसेच सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांनाही पोर्णिमादिना दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती दिली.

पारंपारिक पद्धतीने उर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती खर्च होते. उर्जेची बचत केल्यास नैसर्गिक खनिज संपत्तीचेही जतन करणे शक्य होईल. तसेच उर्जा बचत ही काळाजी गरज बनली असून प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन उर्जा बचत करावी असे आवाहन यावेळी आमदार अनिल सोले यांनी केले. या अभियानामुळे २६९४.९३ किलोवॅट इतकी उर्जेची बचत करण्यात आली. प्रत्येकाने पोर्णिमेच्यादिवशी एक तास अनावश्यक विद्यूत उपकरणे बंद ठेवून अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

स्वयंसेवकांच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे अजय मानकर, सुनील नवघरे, भारती बुंदे, रमेश कानगो, संगीता फडणवीस, शरद बांते, प्रदीप सोनोले,लालचंद चौधरी, मधूकरराव पाठक, श्रीधर चौहान, दिनेश बुरकुडे, संगपाल काळे, नितीन कठाने, सुरभी जयस्वाल, मेहूल कोसरकर, कल्याणी वैद्य, कार्तिकी कावळे, विष्णूदेव यादव, हेमंत अमेसर, लिपीशा काचोरे, अमोल भलमे उपस्थित होते.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement