Published On : Fri, Jan 3rd, 2020

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Advertisement

निमित्त मा.उपमहापौर व्दारा विनम्र अभिवादन

अडाणीपणाचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, वार्डाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

या प्रसंगी सर्वश्री. शरद वानखेडे, गणेश नारवले, चंद्रशेखर हिंगे, कु.अपर्णा टेंभरे, कु.गायत्री टेंभरे, सौ.संद्या इंगळे आदी उपस्थित होते.

तसेच म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महापौर कक्षात तसेच महिला व बालकल्याण समिती सभाकक्षात उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती संगीता गि-हे, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती संजयकुमार बालपांडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, समाजकल्याण विभागाच्या शारदा भुसारी, भावना यादव, कविता खोब्रागडे, पूनम वाघाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.