Published On : Mon, Jul 30th, 2018

तहसील कार्यालयात महामार्गावरील विविध मुद्यावर बैठक

रामटेक : मनसर पवनी देवलापार येथील राष्ट्रीय महामारगावरील चौपदरीकरणासाठी शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले.

उपविभागिय अधिकारी राम जोशी रामटेक यांनी राष्ट्रीय महामार्गावरील मौजा मनसर,कान्दी,पवनी,देवलापार मंदिर ज्यांची जमिन,घरे,दुकाने रस्तेकरीता भुसपांदीत झाल्यामुळे त्याचा मोबदला मिळण्यात होणारा विलंब ,योग्य मोबदला, इत्यादी समस्या जाणून घेण्यासाठी त्यावर उपाय योजना करून कार्यवाही करण्यास आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, तहसिलदार धर्मेश फुसाटे, पोलीस निरीक्षक दीपक वंजारी,देवलापार पोलीस निरीक्षक सुरेश मटामी, कट्टा उपसरपंच जयस्वाल मॅडम ,उप अधीक्षक भुमि अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अधिकारी,आरियंटल कंपनी प्रतिनिधी, संबंधित गावांतील नागरिकांच्या समस्या ऐकून १४आगष्ट पर्यंत महामार्गावरील कामातील अडथळे दूर करून घ्यावी अन्यथा अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ज्यांच्या ज्यांच्या जमिनी किंवा मालमत्ता या रास्तेनिर्मितीसाठी घेण्यात आली किंवा संपादित करण्यात आली आहे त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.

ज्या प्रकरणात लक्ष अंतिम निवाडा झाला असेल परंतु ज्यांची जमिन,घर सुटले असेल तर त्यांनी अप्पर आयुक्त नागपूर कडे अपिल करावी असे ह्यावेळी सांगितले.