Published On : Wed, Nov 13th, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची बैठक पार ;बैठकीत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी ५ नेत्यांची समिती स्थापन

– विधानभवनाच्या पायर्‍यांवर शरद पवारांनी आमदारांसोबत काढले छायाचित्र

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली असून या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश आहे.

आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधानभवनात आले होते. त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व रवाना झाले.

मात्र याअगोदर विधानभवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी सर्वांसमवेत एक छायाचित्र काढले.