Published On : Wed, Nov 13th, 2019

भव्य शोभायात्रेने अखण्ड हरिनाम सप्ताहचा समारोप

Advertisement

आमदार सुनीलबाबू केदार यांच्या शुभ हस्ते होणार श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिराची स्थापना व उदघाटन

कामठी:-कार्तिक मास निमित्त प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या हनुमान मंदिर दुर्गादेवी नगर येथे श्री हनुमान मंदिर देवस्थान कमिटी व काकड आरती उत्सव समिती च्या वतीने 6 नोव्हेंबर पासून ते 12 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाअंतर्गत दररोज ह.भ.प.चिंधबाजी महाराज सरोदे यांच्या दैनंदिन श्रीमद भागवत कथा प्रवचनातून परिसरात उत्साहपूर्ण तसेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते इतकेच नव्हे तर परिसरात जणू काही सृष्टी निर्मिती ध्रुव चरित्र्यमय वातावरन निर्माण झाले होते

तर बालगोपालांवर भारतीय संस्कृतीचे बीज पेरण्यात आले.आज 13 नोव्हेंबर ला सकाळी 9 वाजता भक्तांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर दुपारी 1 ते 3 दरम्यान ह.भ.प.चिंधबाजी सरोदे महाराज यांच्या किर्तनानंतर भव्य महाप्रसाद वितरण करून या श्रीमद भागवत कथा सोहळा व अखण्ड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. दरम्यान श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिराची स्थापना व उदघाटन कार्यक्रम सुद्धा होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनीलबाबू केदार यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर तर प्रमुख उपस्थितीत ह भ प चिंधबाजी महाराज सरोदे राहणार आहेत

या श्रीमद भागवत कथा प्रवचन कार्यात ह.भ.प.चिंधबाजी सरोदे महाराज, ह.भ.प. विष्णुपंत जाधव महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर सरोदे महाराज, ह.भ.प. रेवनाथ महाराज पांडे,ह.भ.प. राजेंद्र भक्ते महाराज, ह.भ.प. मनोहरराव धाबे महाराज,, ह.भ.प लक्ष्मण महाराज यानी विशेष भक्तिमय भूमिका साकारली तर

या कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी कामठी नगर परिषद चे माजी उपाद्यक्ष काशीनाथ प्रधान,वनिता प्रधान,श्री हनुमान मंदिर देवस्थान कमेटी व काकड़ आरती उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र सार्वे, श्यामजी देशपांडे,मोहनजी मते, नत्थुजी रघटाटे, प्रवीण सार्वे, राजकुमार बोंबाटे, उमेश बोंबाटे, पलाश मेरखेड, शुभम बोंबाटे, किशोर पार्लेवार, तुषार बोंबाटे, प्रतीक धुर्वे, रोहित मते, कार्तिक बॉंबाटे, सुनील माहुरे, विनोद काटकर, काशिनाथ प्रधान, दिनेश मेरखेड, आदित्य दिवटे, आदित्य उपासे, अथर्व प्रधान, सुरेंद्र सार्वे, विनोद बगडते, खुशाल शेंद्रे, गौरव बगडते, दक्ष राऊत, अनुश ठाकरे, समर प्रधान, युगा भोयर, शौर्य भुरले, ओजस प्रधान यासह मुख्य संरक्षक तसेच महाप्रसाद व्यवस्थापन समिती च्या समस्त पदाधिकारी व सदस्यानी मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी