Advertisement
आज मंत्रालयात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त शीतल उगले यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण करून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची व प्रकल्पांची माहिती सादर केली. प्राधिकरणाचा नवा लोगो असावा याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मागील बैठकीच्या इतिवृत्तास व अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली.
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव युपीएस मदान, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, मनपा आयुक्त अभिजित बांगर, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय सचचालक पी अन्बलगन, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.