Published On : Tue, Jan 1st, 2019

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

123 कोटींच्या पाणीपुरवठा योजना

मुंबई : नागपूर शहराचा मध्य भाग व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या 2 ऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज महामेट्रोच्यावतीने नागपूर मेट्रो टप्पा २ चे सादरीकरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समोर सादर करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

नागपूर शहरामध्ये मेट्रोचा पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर शहराचा मध्यभाग व उपनगर जोडले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 11 हजार 216 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्साही असणार आहे.

नागपूर मेट्रो टप्पा 2 ची वैशिष्ट्ये

नागपूर मेट्रो टप्पा 2 हा 48.3 किमीचा आहे.

यामध्ये एकूण 35 स्थानिकांचा समावेश

मेट्रो 1 ए – मिहान ते औद्योगिक विकास महामंडळ ईएसआर (18.7 किमी)

मेट्रो 2 ए – ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी (13 किमी)

मेट्रो 3 ए – लोकमान्य नगर ते हिंगणा (6.6 किमी)

मेट्रो 4 ए – पार्डी ते ट्रान्सपोर्ट नगर (5.5 किमी)

मेट्रो 5 – वासुदेव नगर ते वाडी (4.5 किमी)

टप्पा 2 मुळे 2024 मध्ये 2.9 लाख प्रवाशी प्रती दिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.

टप्पा 1 व 2 मुळे एकूण 5.5 लाख प्रवाशी प्रती दिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.