Published On : Thu, Jul 11th, 2019

वैद्यकीय सल्लागार समितीची बैठक

कामठी:- येथील 50 खाटांचे शासकीय उपजिल्हा रुगणालय हे 100 खाटांचे विस्तारीकरण काम प्रगती पथावर असून लवकरच या रुग्णालयातुन अत्याधुनिक रुग्णसुविधा मिळणार आहेत तेव्हा सद्यस्थितीत असलेल्या आरोग्य व्यवस्थे संदर्भात येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नुकतीच वैद्यकीय सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत रुग्णसुविधा, आरोग्यव्यवस्था, अपुरे डॉक्टर, शीतगृह, सोलर वर चालनारी विद्दूत सेवा, आदी विषयावर चर्चा करीत योग्य ते उपाय सुचविण्यात आले.तसेच या रुग्णालयात होत असलेली गैरसोय ज्यामध्ये वाहनतळ , आदी समस्येबाबत चर्चा करण्यात आली.

ही बैठक वैद्यकिय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ महेश महाजन, यांच्या अध्यक्षतेखाली तर शासकिय उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, रणाळा ग्रा ग्रा प सदस्य विनोद पाटील, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी