Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांचे नाव आघाडीवर; नियुक्तीची शक्यता बळावली

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असून, त्यांच्या नियुक्तीची शक्यता अधिक दृढ झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस दलातील त्यांच्या दीर्घ आणि धाडसी कारकिर्दीमुळे महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित वादामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनुभवी अधिकाऱ्याकडे जबाबदारी?
महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असून, अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये स्वतःहून दखल घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. त्यामुळे या पदासाठी कठोर, निष्पक्ष आणि अनुभवी व्यक्तीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मीरा बोरवणकर यांनी आपल्या सेवाकाळात अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या असून, अंडरवर्ल्डविरोधातील कारवाईतही त्यांनी ठसा उमटवला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ अशी ओळख मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही बोरवणकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा महिला आयोगाला होईल, अशी भूमिका अनेकांकडून मांडली जात आहे.

कोण आहेत मीरा बोरवणकर?
मीरा बोरवणकर या १९८१ बॅचच्या निवृत्त आयपीएस अधिकारी असून, त्या देशातील धाडसी महिला अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. मुंबईतील गुन्हेगारीविरोधातील मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘लेडी सिंघम’ म्हणूनही त्यांची ओळख आहे.

त्यांचे वडील बीएसएफमध्ये कार्यरत होते, तर पती अभय बोरवणकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. माजी आयपीएस किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश केला.

राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी बोरवणकर यांची नियुक्ती होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement