Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पश्चिम बंगाल व आसाममधील भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबाबत आमदार डॉ. परिणय फुके यांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार डॉ. Parinay Fuke यांनी आनंद व्यक्त करत ही जनतेच्या विश्वासाची मोठी पावती असल्याचे सांगितले.

“हा विजय म्हणजे विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या राजकारणावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचे भक्कम संघटन कौशल्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष J. P. Nadda यांचे मार्गदर्शन यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये जनतेने अराजकता, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला नाकारत विकासाच्या मार्गाची निवड केली आहे. आसाममध्येही भारतीय जनता पक्षावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

केरळमध्ये पक्षाचे खाते उघडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, “ही केवळ सुरुवात आहे. येत्या काळात केरळमध्येही भारतीय जनता पक्ष अधिक बळकट होईल आणि सत्तेपर्यंत पोहोचेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशभरात भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता, आगामी काळात इतर राज्यांमध्येही पक्ष आणखी मजबूत होईल, असा ठाम विश्वास आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला.

“विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या मार्गावर देश पुढे जात राहील, हीच अपेक्षा,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement