Published On : Wed, Dec 4th, 2019

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेचे नाव तुम्हाला ठाऊक आहे का ?

नागपूर : दिल्लीत वर्ष-२०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक कोर्ट वर चालले. अखेर घटनेतील दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, या प्रकरणातील मृत मुलीचे नाव काय आहे ही बाब तुम्हाला माहित आहे का?

वरील प्रश्नाचे उत्तर ‘ नाही ‘ असे असेल तर हैदराबाद घटनेतील पीडितेचे नाव, तिचा फोटो आणि पत्ता व्हायरल करणे हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांचे आणि कायद्याची उल्लंघन नाही का? घटनेच्या दिवशी काही प्रसारमाध्यमांनी पीडितेचा फोटो आणि तिच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून बातम्या प्रसारित केला. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे. नागरिक मृत मुलीला सोशल मीडियावर तिचे नाव आणि फोटोसह श्रद्धांजली वाहत आहे. घटनेप्रति नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत असला तरी पीडितेचा फोटो आणि नाव जगजाहीर करणे ही घटना तिच्या परिवारासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हैदराबादच्या ज्या भागात पीडितेचा परिवार राहतो तेथील नागरिकांनी ‘मीडिया आणि राजकीय पुढायांनी येथे येऊन आम्हाला त्रास देऊ नये. आम्हाला केवळ न्याय पाहिजे आहे, असे फलक लावले आहे. काही नामांकित मीडिया ग्रुप त्याच्या चॅनलची ‘ टीआरपी ‘ वाढविण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांच्या मुलाखती आणि त्यासंबंधित बातम्या प्रसारित करीत आहे. यामुळे पीडितेचा परिवार आणि आसपासच्या नागरिकांचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पीडितेच्या फोटोसह प्रदर्शन अयोग्य

या क्रुर हत्याकांडाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. शासनाने या प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक ‘ न्यायालयात केली जाईल अशी माहिती दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडियात पीडितेचे नाव आणि फोटो व्हायरल करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा आहे.

… Ravikant Kamble

Advertisement
Advertisement