Advertisement
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत 17 ग्रॅम MD पावडरसह एका आरोपीला अटक केली. मैत्री बौद्ध विहाराजवळ झालेल्या या कारवाईत पोलिसांनी MD, मोबाईल आणि मोटारसायकलसह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सनी बागडे (29) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रामबाग परिसरातील रहिवासी असून पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. जप्त करण्यात आलेल्या MDची किंमत सुमारे 51 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात स्वप्निल उर्फ बबलू दिनेश निषाद आणि दीक्षित धावेकर या दोन संशयितांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




