Published On : Fri, Mar 19th, 2021

दोन दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेसाठी मनपा तर्फे आर्थिक सहाय्य महापौरांचा पुढाकार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग खेळाडू कु.रोशनी प्रकाश रिंके आणि कु.प्रतिभा कृष्णराव बोंडे यांना नॅशनल पॅरालिफिंटग चॅम्पीयनशीप स्पर्धा खेळण्याकरीता बेंगलूरु (कर्नाटक राज्य) साठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.

महापौर श्री.दयाशंकर तिवारी यांनी दिव्यांगासाठी विविध योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्यता करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या घोषणेनुसार एकलव्य राज्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू रोशनी रिंके तसेच एकलव्य राज्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिभा बोंडे यांना क्रांतीराव स्टेडियम बेंगलूरु येथे २० व २१ मार्च २०२१ रोजी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येकी रु १५,०००/- प्रमाणे एकुण रु.३०,०००/- ची सहाय्यता मनपाच्या समाजकल्याण विभागाकडून करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

उक्त स्पर्धेकरीता दि महाराष्ट्र स्पेट पॅरालिपीक असोसिएशन तर्फे अध्यक्ष श्री. मनोज बालबुधे आणि सचिव श्री. विजय मुनीश्वर यांनी दोघींची निवड केली.