Published On : Fri, Mar 19th, 2021

प्रभाकरराव दटके रोग निदान केन्द्राला आयुक्तांची भेट

नागपूर: मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी व वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. संजय महाजन यांनी स्व.प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केन्द्राला भेट देवून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

हे लसीकरण केन्द्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, गांधीबाग – महाल झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, नगरसेवक श्री. राजेश घोडपागे, सहाय्यक आयुक्त श्री. अशोक पाटील, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.